बारामती : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विक्रमी विजय संपादन करत बारामतीच्या लोकशाही इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. 2 लाख 18 हजार मतांच्या प्रचंड संख्येने विजय प्राप्त करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. पवार कुटुंबाच्या राजकीय बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवारांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
मतमोजणी सुरवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीची मतांची चाचणी घेणे आली आणि त्यांची अंतिम निकालात त्यांनी 2 लाख 18 हजार मतांची विक्रमी विजय नोंदवल्यानंतर प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडाला. या निकालाने महाराष्ट्राचे सर्व विजयाचे विक्रम मागे टाकले आहेत.
बारामतीतील वखार महामंडळ गोडाऊनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. निकाल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्र सुनेत्रा पवार समर्थकांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजीने दणाणून गेला. समर्थकांनी मुलाना मिठाई भरवत आनंदोत्सव केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा विजय बारामती पुरता नसून राज्याच्या अंतिम निकाली समीकरण दूरगामी परिणाम ठरू शकतो. बारामतीच्या उत्कृष्ट प्रतिष्ठेला गुणात मोठा फरकाने विजयला हा सुनेत्रा पवार निवडणूक कारकिर्दीतील मोठा मानला जात आहे. या विजयाबाबत सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले, हा विजय बारामतीकरांचा विश्वास आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले.
