मुंबई : देशातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा इतिहास घडला. तब्बल ४८ वर्षांनंतर प्रेस क्लबच्या सर्वोच्च नेतृत्वावर पुन्हा एकदा कोकणाचा झेंडा फडकला, तर ‘सेव्ह द प्रेस क्लब अलायन्स’ (SPCA) ने सर्व सहा पदाधिकारी पदांसह व्यवस्थापन समितीच्या दहा जागांवरही विजय मिळवत एकूण १६ पैकी १६ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत “हिंदुस्तान टाइम्सचे पॉलिटिकल न्यूज एडिटर,”तसेच मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील “भांबेड” गावचे सुपुत्र सुरेंद्र पी. गांगण यांनी ५८२ मते मिळवत प्रतिस्पर्धी राजीव खांडेकर (२६० मते) यांचा तब्बल ३२२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. एकूण ८६२ मते पडली असून २० मते अवैध ठरली.

अध्यक्ष (Chairperson) पदावर एस. बालकृष्णन यांनी ५१० मते मिळवत मयूरेश गणपती (३२२ मते) यांचा पराभव केला. या निवडणुकीत ३० मते अवैध ठरली. तरं
उपाध्यक्षपदी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचेच सन्माननीय सदस्य धोंडीबा (पांडुरंग) म्हस्के अर्थात (PM) ( सकाळ वृत्तपत्र समूह) यांनी ५३७ मते मिळवत आशीष एस.राजे (२९१ मते) यांचा पराभव केला.यातील केवळ ३४ मते अवैध ठरली.
सचिवपदी अनिल कुमार सिंह यांनी ५१३ मते मिळवत सौरभ शर्मा (३१५ मते) यांचा पराभव केला. तरं संयुक्त सचिवपदी सुधाकर एस.कश्यप यांनी ५१७ मते मिळवत रुचा कानोलकर (३२४ मते) यांचा पराभव केला. या निवडणुकीत २१ मते अवैध ठरली.
कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी यांनी ४८७ मते मिळवत शशांक परेड (३३५ मते) यांचा पराभव केला.या निवडणुकीत ४० मते अवैध ठरली.

व्यवस्थापन समितीच्या दहा जागांवरही “सेव्ह द प्रेस क्लब अलायन्स” ने एकहाती विजय मिळवला. त्यात वैभव परब (५३०) यांनी सर्वाधिक विक्रमी मते घेत, स्वप्निल ए. शिंदे, हे त्याखालोखाल “नवराष्ट्र” या नागपूर वरून प्रसिद्ध होणाऱ्या मुंबई आवृत्तीचे फोटोग्राफर (५०२), पूनम डी.अपराज (४९४), मनीषा एम. रेगे (४९१), अनीता डी.शुक्ला (४७४), शाहिद ए. अन्सारी (४४९), आदित्य आर. दुबे (४२७), मधु ए. नैनन (३९६), के.जे.बेनीचन (३८७) आणि उमेश डी.गोस्वामी (३८०) हे सर्व उमेदवार विजयी झाले.यामध्ये सिंधुदुर्गचे वैभव परब यांनी सर्वाधिक मते मिळवत व्यवस्थापन समितीत अव्वल स्थान पटकावले.

या निकालामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या पत्रकारांचे मुंबईच्या पत्रकार विश्वातील वाढते नेतृत्व आणि प्रभाव अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.
मात्र या विजयामागे पडद्यामागे कार्यरत असलेल्या काही ज्येष्ठ पत्रकारांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. कारण अशात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील “फोंडा” गावचे सुपुत्र ज्यांचे शालेय शिक्षणापासून ते थेट कॉलेज च्या अंतिम सत्रापर्यंत ज्या कणकवलीच्या “एसव्हीपीएम” या नामांकित संस्थेत पार पडले त्या राजकीय क्षेत्रात आपला वेगळाच दबदबा असलेले वयाने लहान जरी असले तरी या क्षेत्रातील “बापमाणूस” जो बातमीच्या मागील बातमी काढण्यात “माहीर” मानला जातो त्या पत्रकार अमेय तिरोडकर यांची अचूक निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक समन्वय आणि प्रचाराचे नियोजन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे. तसेच त्यांच्या जोडीला कधी काळी मुंबईत “वृत्त वाहिन्यांच्या क्षेत्रात असताना ज्यांनी ETV मध्ये खास करून गुन्हे वार्ताहर म्हणून आपली कारकिर्द गाजवली त्या व सध्या महासागर दैनिकाचे मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सन्माननीय सदस्य दीपक कैतके यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ रिल्स, आकर्षक पोस्टर्स आणि प्रचार साहित्याद्वारे सदस्यांपर्यंत पॅनेलची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे अनेक सदस्यांकडून सांगितले जात आहे.