मंडणगड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे सोमवार, . ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडणगड येथे आगमन करणार आहेत.

तटकरे यांच्या मंडणगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून, पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तटकरे यांचे सकाळी १० वाजता मंडणगड नगरपंचायत कार्यालय येथे आगमन होणार आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम, महिला तालुकाध्यक्ष सौ. रेश्मा मर्चंडे, शहराध्यक्ष वैभव कोकाटे आणि युवक शहराध्यक्ष साईराज सावंत यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

दरम्यान, तटकरे यांनी अलीकडेच ५ ऑक्टोबर रोजी मंडणगड-दापोली दौरा असल्याचे सांगितले असून, या दौऱ्यात स्थानिक प्रश्न व शेतकऱ्यांची मते जाणून घेणार असल्याचे वृत्त आहे.

मंडणगड नगरपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.