मंडणगड : मंडणगड तालुक्यातील भिंगळोळी समर्थनगर येथे अज्ञात चोराने घरफोडी करून सुमारे २ लाख १८ हजार ५८५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत राजश्री अरुण सुतार (वय ४८, रा. भिंगळोळी समर्थनगर, ता. मंडणगड) यांच्या घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र (१४.५९० ग्रॅम), ६० हजार २१५ रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट (५.८६० ग्रॅम) आणि ६२ हजार ३७० रुपये किमतीची सोन्याची कानातील रिंग (६.२७० ग्रॅम) यांचा समावेश आहे. एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख १८ हजार ५८५ रुपये आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात २ऑक्टोबर ३६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत