सिंधुदुर्ग : ठाकरे गटातील खासदारांच्या कथित बंडाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींना ठाकरे गटाचे नेतृत्वच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या भूमिकेमुळे अनेक खासदार आणि आमदारांनी ठाकरे गट सोडल्याचा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा आरोप केला. तसेच, संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका करत, ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीच या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत, सध्याच्या नेतृत्वाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी संबंध उरलेला नसल्याचा दावा केला.