खेड : महेंद्र जंगम मित्र मंडळाच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खेड शहरातील जगबुडी नदीवर एक हजार दिवे लावण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. यावेळी मंडळाच्या वतीने नदी परिसराची स्वच्छता करण्यात येणार असून, त्यानंतर परिसरात दिवे लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.

या दीपोत्सव कार्यक्रमाला सर्व खेडवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जंगम यांनी केले आहे.