दापोली : महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड येथे नागपंचमीनिमित्त आज वाईल्ड ऍनिमल रेस्क्युअर & रिसर्च आणि वनविभाग दापोली यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व, सापांविषयी असलेले गैरसमज, सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी तसेच साप दिसल्यास त्यांना न मारता सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या प्रसंगी वाईल्ड ऍनिमल रेस्क्युअर & रिसर्च दापोली अध्यक्ष मिलिंद गोरीवले ,सचिव तुषार महाडिक,किरण करमरकर , प्रितम साठविलकर ,शामल साठविलकर, प्रफुल्ल मिसाळ, जमादार फहद, चिन्मय गुरव, वनविभाग दापोली वनरक्षक साबणे सर, सोनाली हसे (कांदळवन विभाग), सौ. अय्यर आणि श्री. पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. विवेक भावे, सचिव श्री. विराज खोत तसेच एन. के. वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद गमरे यांची उपस्थिती लाभली. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची भीती व गैरसमज दूर होऊन सर्पसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्पांविषयी विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली.
