मंडणग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तालुका मंडणगड युवक आघाडीची बैठक शुक्रवारी राज्य कार्यकारिणी सदस्य तथा दलितमित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत युवक आघाडीच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. युवक आघाडीच्या अध्यक्षपदी विधान पवार, सरचिटणीसपदी संकेश कासारे, तर कोषाध्यक्षपदी गौरव मर्चंडे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे, तालुका अध्यक्ष नागसेनजी तांबे, कार्याध्यक्ष संदेशजी खैरे, जिल्हा सहसंघटक विजयजी खैरे, जिल्हा सदस्य किरणजी पवार, माजी युवक अध्यक्ष तथा सरपंच संकेतजी तांबे, सल्लागार भगवान खैर, मयूर खैरे, महेंद्र यादव, मनोहर जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन युवक कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच युवकांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
फोटो ओळी
आरपीआय युवक आघाडीच्या अध्यक्षपदी विधान पवार यांची निवड झाल्यानंतर अभिनंदन करून शुभेच्छा देताना दादासाहेब मर्चंडे व अन्य.