चिपळूण – चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जाग्रूत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे गणेशोत्सव कार्यक्रम रविवार दि .१३ सप्टेंबर ते शनिवार दि .१९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे .
गणेशोत्सव कालावधीत-
रविवार दि . १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री गणेश मूर्तीचे मंदिरात आगमन .
सोमवार दि . १४ सप्टेंबर रोजी पहाटे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा .
गुरुवार दि .१७ सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणेशा समवेत श्री देव काळभैरव -श्री देवी योगेश्वरी आणि श्री देव केदार -श्री देवी जाखमाता यांच्या चल मूर्तींची प्रतिस्थापना.
शुक्रवार दि .१८ सप्टेंबर रोजी श्रींचा दर्शन सोहळा व रात्रौ ९:३० वाजता श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ , ओझरवाडी ग्रामस्थ मंडळ यांचा भजन कार्यक्रम होईल.
शनिवार दि .१९ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता श्री गणेश विसर्जन सवाद्य मिरवणूक श्री जुना काळभैरव मंदिरातुन निघून श्री क्षेत्र गांधारेश्वर नदी घाटावर जाईल.
श्री गणेशोत्सव निमित्त श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण आयोजित कार्यक्रमांची भक्तगण नागरिकांनी नोंद घेऊन श्रींचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट विद्यमाने करण्यात येत आहे.
