चिपळूण : राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांची चिपळूण शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दिलीपराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी चिपळूण तालुक्यातील संघटनात्मक बाबी तसेच आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.
नवनिर्वाचित तालुकाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर दिलीप चव्हाण यांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार सामंत यांनी चव्हाण यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भेटीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सचिन कदम, भरत गांगण, चिपळूण नगरपरिषदेचे पाणी सभापती निहार कोवळे, नगरसेवक विकी लवेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीमुळे चिपळूण तालुक्यातील शिवसेना संघटनेच्या आगामी कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
