नाशिक : परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुबई येथे संस्कार महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

परदेशात स्थायिक असलेल्या भारतीय कुटुंबांना आपल्या संस्कृतीशी, अध्यात्माशी आणि मूल्यसंस्कारांशी जोडणारा हा महोत्सव सर्वांसाठी विशेष ठरला. बालक, युवा, माता-पिता, सेवेकरी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भारतीय संस्कृतीच्या रंगांनी भारावून गेले.

आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनातून मातृ-पितृ भक्ती, कृतज्ञता, सदाचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये नव्या पिढीत रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

अध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, सातासमुद्रापार भारतीय संस्कार जपण्याच्या या कार्याल प्रेरणादायी संबोधले.