महाड: मुंबई येथून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावाकडे रवाना झाले. मात्र महाबळेश्वर परिसरात खराब हवामान असल्यामुळे पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरने पुढील प्रवास करण्याऐवजी महाड येथे उतरवण्यात आले. त्यानंतर शिंदे हे रस्तेमार्गे दरे गावाकडे रवाना झाले.
हवामानातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर महाड येथे उतरल्याची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेलिपॅड परिसरात गर्दी केली.यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.यावेळी शिवसेनेचे महाड तालुका प्रमुख बंधू तरडे तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या
त्यानंतर त्यांच्या ताफ्याच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. विकास गोगावले यांच्या सारथ्याने शिंदे यांचा ताफा महाडहून दरे गावाच्या दिशेने रवाना झाला.
महाड ते दरे या मार्गावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शिंदे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी दरे येथे दाखल झाले. तेथे त्यांनी कुटुंबीय व ग्रामस्थांसोबत गणेशोत्सवात सहभाग घेतला.
दरे येथे पोहोचल्यानंतर विकास गोगावले यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी असलेल्या घरगुती गणरायाचे दर्शन घेतले.
दरम्यान, महाड येथे हेलिकॉप्टर उतरल्याने काही काळ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर रस्तेमार्गे त्यांचा दरे गावाकडे प्रवास सुरळीतपणे सुरू झाला.
