चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांना ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी महावितरणच्या चिपळूण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अनिलकुमार डोंगरे , कार्यकारी अभियंता श्री. धनंजय भामरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाचे पदाधिकारी तसेच महावितरणच्या चिपळूण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.