मुंबई – राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर कर आणि त्यांच्या पिकांना मुबलक पाणी… त्यांच्या शेतात हिरवळ येऊन कष्टाला चांगले फळ मिळो व त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावो असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बळीराजासाठी लालबागच्या राजाच्या चरणी घातले.

राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले.

विघ्नहर्त्या गणरायाने राज्यातील शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ द्यावे, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, पिकांचे नुकसान टळावे आणि बळीराजाचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लालबागच्या राजाच्या चरणी केली.