चिपळूण :- येथील नामवंत हॉटेल व्यवसायिक, माजी नगरसेवक आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री किशोरभाई रेडीज यांची चिपळूण तालुका वैश्य समाजाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री रेडीज यांनी समाज बांधवांचे आभार मानले असून समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करू अशा शब्दात समाजबांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री किशोरभाई रेडीज यांनी पाच वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम नावलौकिक निर्माण केला. चिपळूण तालुका बार रेस्टॉरंट हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत आहेत. तसेच चिपळूण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही ते यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत.
सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रीडा अशा समाजातील सर्व क्षेत्रात ते कार्यरत आहेत. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
