दापोली :- भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतृत्व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दापोलीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील दोन युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी, दापोली कार्यालयात पक्षप्रवेश केला.
यामध्ये शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोष गवळी आणि युवासेनेचे उपतालुकाध्यक्ष ओंकार भगवत यांचा समावेश आहे.
भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत दोन्ही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून दापोलीच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पक्षप्रवेशाच्या वेळी केदारजी साठे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष भाऊ ईदाते, पंचायत समिती सदस्य, शहराध्यक्ष अतुल गोंदकर, शहर सरचिटणीस अमोल तांबे, उपाध्यक्ष मयुरेश वेल्हाळ,तालुका सरचिटणीस संदीप केळकर, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस धीरज पटेल, बाळा पवार रोहित शिंदे अजय साळवी, प्रमोद पांगारकर, ओंकार वेल्हाळ तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
