चिपळूणः येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय (स्वायत), चिपळूण मधीले राष्ट्रीय छात्र सेना विभागातील दिल्ली येथे होणाऱ्या मानाच्या थलसैनिकी कॅम्पसाठी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड  झाली होती. यामध्ये एस.यू ओ. राज कदम, जे.यू .ओ अथर्व कदम, जे.यू. ओ.श्रेयश मानकर हे विद्यार्थी होते.हा थलकॅम्प या विद्यार्थ्यांनी यशस्वी पूर्ण केला .नुकतेच हे विद्यार्थी दिल्लीहुन चिपळूण मध्ये दाखल झाले.महाविद्यालयाचे वतीने ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.तसेच नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, सचिव श्री.अतुल चितळे, सुचयशेठ रेडीज ,निलेश भुरण, प्राचार्य डॉ.माधव बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
दिल्ली येथे होणाऱ्या या थलकॅम्प साठी १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी .सी कराड या युनिट मधून सलग तीन वर्ष डीबीजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड होत आहे, हे कॅम्पसाठी एकाचवेळी एकाच महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड होणे अत्यंत अभिमानाची बाब आहे.डीबीजे महाविद्यालयाने हा देखील एक इतिहास घडवला आहे. या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट प्रा.मधुसूदन माने मेजर नम्रता माने यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे यश नक्कीच गौरवास्पद आहे.पण केवळ यावर न थांबता विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होऊन सर्वोच्च पदावर जाण्याची स्वप्ने पाहावीत.आणि तसे प्रयत्न करावे.महाविद्यालय व संस्था आपल्या सदैव पाठीशी राहिल असे आश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.सी.सी छात्रांनी विशेष परिश्रम घेतले.