चिपळूण : येथील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबीर अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे संपन्न झाले.रक्तदान शिबिराचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.प्रभाकरजी आरेकर यांचे शुभहस्ते प्रतिमापूजन व अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ.अब्बास जबले,डेरववण हॉस्पिटलचे डॉ.सुनिता झुंजारवाड,डॉ.जितेंद्र सप्रे,रवि अग्रवालतसेच संस्थेचे संचालक मंडळ यांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.चिपळूण परिसरातील संस्थेचे ५३ सभासद,कर्मचारी व सेवाभावी नागरिक यांनी रक्तदान करून रक्तदाना सारख्या पवित्र कार्यात सहभाग घेऊन संस्थेला सहकार्य केले.
यावेळी अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ.अब्बास जबले तसेच डेरवण हॉस्पिटलचे डॉ.सुनिता झुंजारवाड यांनी रक्तदानाचे महत्त्व व गरज याबद्दल मनोगत व्यक्त करून संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.प्रभाकरजी आरेकर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे नमूद करून रक्तदात्यांचे विशेष आभार मानले.त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरासाठी सहयोग करणाऱ्या-कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डेरवणचे डॉक्टर व त्यांचा स्टाफ तसेच रक्तदान शिबिरासाठी आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधांसह हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल अपरांत हॉस्पिटलचे डॉ.यतीनजी जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद दिले.संस्थेच्या रक्तदान शिबिराला चिपळूण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती नगरसेवक श्री कपिलजी शिर्के,पाणी पुरवठा सभापती नगरसेवक श्री निहारजी कोवळे,वालोपेचे सरपंच श्री प्रतिकजी सुर्वे तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.संस्थेकडून ९६ वेळा रक्तदान केलेल्या श्री मिलिंदजी चितळे यांचा विशेष सन्मान केला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर,संचालक सर्वश्री दिलीप मयेकर,सुहास भोसले,अरुण पाटील,पराग आरेकर,दिलीप वानकरकर,उदय वेल्हाळ,विजय जाधव,संचालिका सौ.स्मिता आरेकर,श्री म.प्रज्ञा नरवणकर अनेक मान्यवर सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.आभार संस्थेचे व्यवस्थापक संदिप रहाटे यांनी मानले.
