नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पोलीस आणि प्रशासनाची एक चांगली ओळख देशात होती,दुखवटा काळात झालेला अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्यामुळं महाराष्ट्राची बदनामी होत आहे.आता त्याची अशा प्रकरणांमुळं बदनामी होत आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,माणुसकी राहिली आहे की नाही. त्या मंत्रालयात दुखवटा असताना असं झालंच कसं हे खूप गंभीर आहे, शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. याबाबत त्यांनी याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्टे दिला आहे असं मला कळालं आहे. हे प्रकरण माध्यमांनी उजेडात आणलं. त्यामुळं तुमचं अभिनंदन आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत एक स्टेटमेंट द्यावं अन् हे झालंच कसं हे सांगावं अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आमच्या घरातील संस्कार जे झाले आहेत. माझा विश्वास आणि अपेक्षा आहे की आमच्या घरातील मुलं मुलींकडून असं कोणतंही काम करणार नाहीत आणि करू देखील नये. एवढी एक आत्या, आई आणि मावशी म्हणून आमच्या घरातील सगळ्याच मुलांकडून ही अपेक्षा आहे. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे यांना पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,पार्थ पवार यांचे प्रकरण न्यायालयात आहे.तपास अहवाल आणि कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार नाही, न्यायालयाचं यावर काय म्हणणं आहे त्यावर आपण कसं बोलणार. या देशात कोर्टाचा निर्णय आपल्या सर्वांना मान्य करावा लागतो.असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,मुख्यमंत्री हे मंत्रालयाचे प्रमुख आहेत. मंत्री हा मंत्री असतो. त्याला पक्षात विभागू नका. ACB कारवाईचे रिपोर्टिंग कुणाला करत? तर मुख्यमंत्र्यांना करतं. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर बसतात. त्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. या गृहमंत्रालयानेच मंत्रालयातील तिसऱ्या,चौथ्या मजल्यावरील त्यांच्याच कॅबिनेटमधील मंत्र्याकडे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही का? मग ही तक्रार केली कुणी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,कुणीतरी टीप ऑफ दिला ना. हा टिप ऑफ कुणी दिला. स्वतःच्याच मंत्र्याला, मंत्रालयातच कारवाई होते. म्हणजे तुम्हीच तुमच्या मंत्र्यांवर रेड करता, छापा घालता. मुख्यमंत्री ज्या वास्तूत बसतात. त्यात, त्यांच्या डोळ्यासमोर, त्याच मंत्र्यांच कार्यालय तुम्ही सील करता. हा मोठा धक्का आहे. आपल्याच घरात आपण आपल्याच माणसावर छापा घातला असा हा प्रकार आहे. टीप कुणी दिली. हे खरं आहे की खोटं आहे याची उत्तरं माझ्याकडं नाहीत,डेटा आणि वास्तव नसल्यास मी त्यावर अधिक भाष्य करणे, बोलणे योग्य नाही. पण मंत्रालयात स्वतःच्याच मंत्र्यांवर असा छापा घालणं धक्कादायक आहे. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता, पक्षाचे नसता. मंत्री हा पक्षाचा नसतो. तर तुमच्या कॅबिनेटचा असतो, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
