फणसू : पंचायत समिती सेस फंड या योजनेतून फणसू केळशीकरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण करणे या कामाचे भूमिपूजन दापोली मतदार संघांचे आमदार राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रेयाताई कदम यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे,जिल्हा महिला उपसंघटिका सौ.रोहिणी दळवी, कोळबांद्रे पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.ममता शिंदे,पांगारी तर्फे हवेली गणाचे सदस्य नरेश घरटकर,विभागप्रमुख दिनेश जावळे,समन्व्यक विश्वlस खांबे,सिनेट सदस्य सुनील दळवी,सरपंच रेखा खोपटकर,युवती सेना जिल्हा अध्यक्षा सिद्धी शिंदे,नगरसेविका शिवानी खानविलकर,
उपसरपंच दिनेश खळे,माजी उपसरपंच महेंद्र खळे,शाखाप्रमुख रमेश खोपटकर तंटामुक्ती कमेटी अध्यक्ष रमेश पाचकले,उद्योजक प्रफुल खोपटकर संजय केळशीकर रामभाऊ केळशीकर कृष्णा केळशीकर एकनाथ केळशीकर,श्वेता केळशीकर,अश्विनी केळशीकर,सुरज केळशीकर,आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्रेयाताई कदम यांनी उन्हवरे 32 गाव विभागात नामदार योगेशदादा कदम यांचे पूर्ण लक्ष आहे. संपूर्ण मतदार संघा बरोबरच या विभागात फार मोठ्या झपाट्याने विकास कामांचा ओघ सुरु आहे.त्यामुळे आपल्याला निधीची कमतरता कधीही भासणार नाही,असे अभिवचन देत,आता विकास कामांना जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निधीही प्राप्त होत आहे.त्यामुळे नामदार योगेशदादा कदम यांचे हात विकास कामाद्वारे अधिक बळखट होत आहेत.आता विकासापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही,असे सांगत तुमची साथही तितकीच महत्वाची असल्याचेही श्रेयाताई यावेळी म्हणाल्या.