खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी खेड तालुकास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा मेळावा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात, रा. भि. धात्रे स्मृती विचार मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यादरम्यान मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आह या कार्यक्रमासाठी खेड तालुकाध्यक्ष बाबाराम पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. सुरेंद्र तांबे, तालुका कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, तालुका सचिव सुधीर जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांचे आवाहन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांनी केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याबरोबरच संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
स्थळ : मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड, जिल्हा रत्नागिरी.
दिनांक : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६.
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.