मंडणगड – जय हनुमान क्रिकेट संघ, नारगोली यांच्यावतीने सन २०२६-२०२७ या क्रिकेट हंगामाचा शुभारंभ २५ ऑक्टोबर २०२६ रोजी खदान मैदान, नालासोपारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रिकेट हंगामाचा शुभारंभ अँड. राकेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देणे, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये क्रीडाभावना, एकोपा व संघभावना वाढविणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उद्घाटन समारंभाला दत्ताराम पाष्टे, दिलीप पवार, अनिल मोकळ, दत्ता मोहिते, सुनील मिसाळ, प्रवीण मोकळ, प्रशांत मोहिते, कर्णधार प्रणव मिसाळ, मनोज पाष्टे स्वप्नील मिसाळ स्वप्नील घडवले विश्वनाथ पवार आणि सर्व सहकारी खेळाडू क्रिकेटप्रेमी नागरिक तसेच संघाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या. नारगोली येथील तरुणाईला मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात या क्रिकेट हंगामाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळून परिसरात क्रीडासंस्कृती अधिक बळकट होईल, व गावच्या मुंबई स्थित तरुणांना एकत्र येण्याचे चे एक उत्तम माध्यम असल्याचे सगळ्यांना आरोग्याची व स्वतःची काळजी घेत गावाची तरुणाई संघटित ठेवण्यासाठी जे जे माझ्याने शक्य होईल ती ती मदत मी कार्यास सदैव तत्पर असल्याचे ॲड राकेश साळुंखे यांनी सांगीतले.
