मंडणगड – मंडणगड पंचायत समितीच्या सभापतींसाठी नामदार योगेश कदम यांच्याहस्ते 29 ऑक्टोंबर 2026 रोजी दापोली येथे नवीन वाहन प्रदान करण्यात आले. मंडणगड पंचायत समितीकडे सभापतींसाठी वेगळे वाहन नसल्याने नामदार योगेश कदम यांना शासनाकडे पाठपुरावा केल्याने सभापतींना हक्कांचे नवे वाहन उपलब्ध झाले आहे.
त्यामुळे तालुक्याचा प्रवास करताना सभापतींची होणार गैरसोय दुर झाली आहे. दापोली येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी नामदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे पंचायत समिती सदस्य सौ. दिप्ती घडशी, इरफान बुरोंडकर, वसीम चिपोलकर, दौस्त चौगुले, पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह मंडणगड तालुक्यातील शिवसैनीक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
