चिपळूण : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅब, चिपळूण यांच्या वतीने अंध निधी जमा केला जातो. प्रशालेतील विद्यार्थी समाजातील अंध बांधवांसाठी घरोघरी जाऊन हा निधी गोळा करतात.हा निधी गोळा करत असताना समाजातील लोकांशी प्रत्यक्ष संबंध येतो. लोकांची अंध बांधवांच्या प्रती असणारी आत्मीयता विद्यार्थ्यांना अनुभवता येते. आपण समाजाचे काही देणे आहोत हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना डोळस बनवतो.हा निधी गोळा करताना समाजात कसं वावरायचं? आपलं बोलणं प्रभावीपणे लोकांना कसं पटवून द्यायचं याचाही वस्तूपाठ मुलांना मिळाला.
यावर्षीही युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 82781रु. इतका निधी जमा केला.समाजभान असणारा हा उपक्रम स्तुत्य असाच आहे. जास्तीत जास्त निधी गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तिपत्रक देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर, उपमुख्याध्यापिका सौ कारदगे मॅडम, पर्यवेक्षक श्री खाडे सर, श्री मुंढेकर सर कौतुक केले. व सदर निधी माननीय मुख्याध्यापक यांनी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींकडे सुपूर्त केला.
युनायटेड इंग्लिश स्कूलची अशी ही सामाजिक बांधिलकी
