मंडणगड : पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्येच सार्वजनिक ठिकाणी आपापसात शिवीगाळ व एकमेकांना मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली.
याबाबत मंडणगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार तेजस मोरे यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील दिली आहे. माहितीनुसार, आरोपीत राज अभिषेक विन्हेकर (वय २२, रा. शिरवली, पो. पांगरी, ता. महाड, जि. रायगड) आणि अनिल अनंत घरटकर (रा. भिंगळोळी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी फिर्यादी यांच्या समक्ष मंडणगड पोलीस ठाण्याच्या इमारतीतील सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना शिवीगाळ केली. तसेच परस्परांना मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.