खेड :- शहरातील खेड बस स्थानकाजवळील एल.पी. हायस्कूलच्या आवारात रविवार वार दि. 11 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8.55 सुमारास आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशामक दलाचे जवान दिपक देवळेकर, शाम देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहायक फायरमन प्रणय रसाळ, सुरज शिगवण, खेड नपाचे गटनेते निकेतन पाटणे, नगरसेविका सौ. आरती पवार आणि अग्निशामक बंबासह घटनास्थळी दाखल होत, अग्निशामक बंबाच्या पाण्याच्या फवा-याने पाण्याचा सततचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवित, आग आटोक्यात आणण्यात यश प्राप्त केले. या आगीत सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. वर नमुद ठिकाणी सुकलेल्या झाड तोडण्यात आले होते, त्या झाडाने अचानक पेट घेतल्याने आग लागली. पण आग नियंत्रणात आणण्यात खेड नपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. ही विशेष अभिनंदनीय बाब आहे.