रत्नागिरी : रत्नागिरी पालिकच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची आज पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. इमारतीच्या कामाला उशिर झाल्यामुळे ठेकेदार कंपनीला त्यांनी चांगलेच सुनावले. १ मे २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. त्यादिवशी या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्या तारखेपूर्वी मला इमारतीचे काम पूर्ण हवे. ते कसे करायचे तो तुमचा भागा आहे. कोणाला मदतीला घ्यायचे ते घ्या पण काम पूर्ण हवे, असे खडसावले. 

पालकमंत्री उदय सामतं गेली दोन दिवस रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शहर आणि परिसरातील विकास कामांचा ते आढावा घेत आहेत. काल रात्री पेठकिल्ला येथील शिवसृष्टीची पाहणी केली. शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीला सांगितले आहे. या शिवसृष्टीमुळे पर्यटनाला शहर पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिक आकर्षित होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच विमानतळाच्या धावपट्टीसह टर्मिनल बिल्डिंगचे काम देखील प्रगती पथावर आहे. त्याचीही पालकमंत्री सामंत यांनी पाहणी केली. टर्मिनल बिल्डिंगचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आले आहे. तारांगणाची देखील सामंत यांनी पाहणी केली. कोट्यवधि रुपये खर्च करून ही विकास कामे केली आहेत. त्याचा श्री. सामंत यांनी आढावा घेतला. 

विशेष म्हणजे रत्नागिरी पालिकेची जुणी इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येत आहे. परंतु या इमारतीचे काम अजून अपूर्ण आहे. काम रखडल्यामुळे या कामाचीही आज दुपारी श्री. सामंत यांनी पाहणी केली. यावेळी ठेकेदार कंपनीला त्यांनी चांगलेच सुनावले. सुमारे पंधरा कोटीच्यावर खर्च करून ही इमारत बांधली जात आहे. परंतु अजून अंतर्गत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे  पाहणी दरम्यान पालकमंत्री चांगलेच संतापले. १ मे ला या इमारतीचे उद्घाटन करण्याची तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम कसे पूर्ण करायचे तो तुमचा प्रश्न आहे. न्याती कंपनीला सोबत घ्या आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH