कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा पार पडला. या सौद्यात १५ आंब्यांच्या पेटीला ६ हजार २१ रुपये इतका दर मिळाला.
रत्नागिरीतील बेर्डे या शेतकऱ्याकडून व्यापारी आकाश तोडकर यांच्याकडे आलेल्या आंब्याची पहिली पेटी व्यापारी प्रसाद वळंजू यांनी खरेदी केली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरात तेजी पाहायला मिळत आहे. साधारण मे महिन्यापर्यंत आंब्याचे दर उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻