चिपळूण: दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या चिपळूण मधील वीरेश्वर मंदिर सेवाकेंद्रातर्फे समाज हितासाठी श्री क्षेत्र परशुराम येथे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सेवेकऱ्यांनी मानसन्मान आणि सामूहिक सेवा रुजू केली.

संभाव्य मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटांपासून समाज आणि समस्त जीवसृष्टीचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना भगवान श्री परशुरामांच्या चरणी करण्यात आली.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने ठिकठिकाणी सेवेकरी स्थानिक दैवतांचा मानसन्मान करून संभाव्य संकटांपासून जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. या आदेशान्वये वीरेश्वर मंदिर सेवाकेंद्रातील ३३ सेवेकर्‍यांनी श्रीक्षेत्र परशुराम येथे जाऊन श्री. काळ काम परशुराम, श्री गणेश, श्री रेणुका माता आणि श्री.ब्रह्मेंद्रस्वामी यांचा मानसन्मान केला आणि भगवान परशुराम यांच्या चरणी समस्त जीवसृष्टीच्या रक्षणासाठी प्रार्थना केली.
यावेळी सेवेकर्‍यांनी सामूहिकपणे श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र आणि रामरक्षा पठण केली.
ज्येष्ठ सेवेकरी श्री माधव खेडेकर, सौ. मीनल काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप ठसाळे , सुचिता आवळे, निशा बांदेकर ,उज्वला शिंदे, ज्योती पालकर ,प्रिया खानविलकर या कमिटीच्या नियोजनानुसार ही सेवा समस्त सेवेकरी परिवाराने आनंदाने रुजू केली.
चिपळूण बस डेपोच्या शेजारी भगवान शिवाचे श्री वीरेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दर गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता सेवाकेंद्रातर्फे सामूहिक आरती आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम होत असतो. या मार्गातर्फे ८० टक्के सामाजिक कार्य आणि केवळ २० टक्के अध्यात्मिक सेवा केली जाते. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून वेळोवेळी स्वामी सेवा कार्याला सहकार्य केले जाते. या सेवाकेंद्रात वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबरच समाज हितासाठी विविध उपक्रम परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये राबविले जातात.