खेड : होळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी तसेच होळी पेटवताना अनावश्यक वृक्षतोड करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक संदेशाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जनजागृतीही प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या निमित्ताने सर्व कोकणवासीयांना मनोभावे शुभेच्छा दिल्या. सण आनंदात, उत्साहात आणि पर्यावरणाचे भान राखून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻