कणकवली (रोशन तांबे): सिंधुदुर्गात दुपारी उष्मा असला तरी पहाटे दाट धुकं आणि सुखद गारवा सध्या अनुभवायला मिळतोय. त्यामुळे मुंबई, पुण्यातून आलेले चाकरमानी आणि स्थानिक नागरिक सुखावून गेले आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग हा तळ कोकणाचा भाग म्हणून ओळखला जातो. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. निळाशार समुद्रकिनारा, ठिकठिकाणी फुललेल्या बागायती, शेतात मग्न असलेले शेतकरी आणि निसर्गाची साथ असे अत्यंत प्रसन्न,उत्साही आणि आल्हाददायक वातावरण सिंधुदुर्गमध्ये अनुभवायला मिळतंय. सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून जागोजागी होळ्या पेटवल्या जातात. मुंबई पुण्यातून आलेले चाकरमानी उत्सवाचा आनंद लुटताना दिसतात.होळी पेटल्यावर वातावरणातील गारवा कमी होऊन उष्मा वाढतो मात्र सिंधुदुर्गात पहाटेच्या दाढ धुक्यामुळे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव चाकररमानी घेत आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH