चिपळूण : डेरवण यूथ गेम्स, अर्थात ‘डीवायजी २६’मध्ये पार पडलेल्या नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शूटर्सनी अचूक नेम साधत वर्चस्व गाजवले. कोल्हापूरच्या एकूण २१ नेमबाजांनी पदके पटकावली. तर त्याखालोखाल सोलापूरच्या नेमबाजांनी दहा पदके पटकावत स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले.
नेमबाजी ही स्पर्धा १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील, मुले आणि मुली यांच्यासाठी पीपसाइट रायफल, ओपनसाइट रायफल आणि एअर पिस्तूल अशा तीन प्रकारांत घेण्यात आली. राज्यभरातून एकूण १४८ नेमबाजांनी यात भाग घेतला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अर्णव वाघारेने एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. कोल्हापूरच्या आराध्या कांबळेने १४ वर्षांखालील एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक तर कोल्हापूरच्या आयुषी शिंदेने पीपसाइटमध्ये सुवर्णपदक मिळवले. ओपनसाइट प्रकारामध्ये कोल्हापूरच्या इच्छा गायकवाडने सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षांखालील गटात ओपनसाइटमध्ये अथर्व सुतार, १४ वर्षांखालील गटात ओपनसाइटमध्ये ऋग्वेद खोत सुवर्णपदक पटकावले.
सोलापूरच्या यशराज गुजरेने १४ वर्षांखालील एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. मुंबईच्या तीन नेमबाजांनी पदके पटकावली. १४ वर्षांखालील गटात निधी हडकरने कांस्यपदक मिळवले. अनेस्का पालांडे पीपसाइट १४ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले. तर इशान नाडर १४ वर्षांखालील पीपसाइट कांस्यपदक मिळाले आहे. सोलापूरच्या स्वरा कलधोणे या मुलीने १७ वर्षांखालील गटात एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण तर वैष्णवी गुजरेने १४ वर्षांखालील गटात एअरपिस्तूलमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.

तिरंदाजीत साताऱ्याचा दबदबा
तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या एकूण २२ खेळाडूंनी पदके जिंकली. तर पुण्याच्या एकूण १० खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत आपला ठसा उमटवला. ठाण्याचे दोन खेळाडू सुवर्णपदक विजेते ठरले. १० वर्षांखालील गटात स्वरुप कासेकरने कम्पाऊंड फेरीत तर रिकर्व्ह फेरीत शरयू सैतवडेकर यांनी सुवर्णपदक जिंकले. इंडियन फेरीमध्ये १० वर्षांखालील गटात समर्थ सूर्यवंशी, मुलींमध्ये आराध्या शिंदे तर १८ वर्षांखालील गटात समर्थ थोपटे, राशी गर्दे यांनी सुवर्णपदक मिळवले. १८ वर्षांखालील मुलींच्या कम्पाऊंड फेरीत तीनही पदके पुण्यातील खेळाडूंनी जिंकली. समद्धी तौर, अनुष्का पवार, अभिद्या गावडे या अनुक्रमे पदकविजेत्या ठरल्या. सांगलीच्या ज्योती सावंत, अफरीन पठाण, विराज पवार हे खेळाडू पदकविजेते ठरले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75