नागोठणे (महेश पवार) : तिथी प्रमाणे येणारी शिवजयंती नागोठणे शहर व नागोठणे ग्रामीण विभागातील अनेक गावांत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. रायगड किल्ल्यावरुन शिवप्रेमींनी आणलेल्या शिवज्योतीचे नागोठ्यातील छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी १०.३० वा. आगमन होताच शिवभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत शिवज्योतीचे स्वागत केले. नंतर शिवसेनेच्या नागोठणे शाखेत छ. शिवाजी महाराजांच्या प्रतीमेच्या व शिवज्योतीच्या पुजनाने नागोठण्यातील शिवजयंतीची सुरूवात करण्यात आली.

यानंतर सायंकाळी सहा वाजता शिवसेना शाखेपासून छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत, पारंपारिक वाद्यांच्या साथीने छ. शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य अशी मिरवणुक नागोठणे शहरात काढण्यात आली. नागोठण्यातील या मिरवणुकीत उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विलास गोळे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुमितदादा काते, शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, उबाठा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे, नागोठण्यातील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इम्रान पानसरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, प्रकाश मोरे, शिवसेना नागोठणे संघटक दिनेश घाग, उबाठा शिवसेना नागोठणे शाखाप्रमुख राजेश सुर्वे, उपशाखाप्रमुख पंकज कामथे, शहर संघटक बाळू रटाटे, शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष मुकेश भोय व कैलास गोरे, उपाध्यक्ष संजय पाटील व अजित दळवी, सचिव श्रीराम मांगले, सह सचिव अविनाश भोसले, खजिनदार संदीप राऊत, सहखजिनदार बाळू रटाटे, नारायण तेलंगे, सल्लागार कीर्ती कुमार कळस, जितेंद्र कजबजे, सुहेल पानसरे, मनोज कोळी सदस्य संतोष घोसाळकर, सचिन रोडेकर, मंगेश वाघमारे, प्रसाद कोळी, नागेश सुर्वे, सलीम अत्तार, प्रवीण चितळे, दिनेश वादळ, संदीप शिर्के, रुपेश जगताप, राकेश चितळकर, ऋत्विज माने आदींसह उत्सव समितीचे सर्व सदस्य आदींसह नागोठणे शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छ. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील व घोडयावर स्वार असलेला मराठा आळीतील तरुण संकेत लाड सोबत रथामध्ये विविध ऐतिहासिक वेशभूषेतील छ. शिवाजी महाराज झालेले बालकलाकार
तेज राजेश सुर्वे, बाल शिवाजी महाराज श्रीयश सचिन शेडगे, मावळे ओमकार नामदेव साळुंखे, पीयुष दीपक साळुंखे, कु .स्वरा स्वप्नील शिर्के तसेच मिरवणुकीत वैविध्यपूर्ण नृृृृत्य करण्यासाठी आणलेला घोडा, खालुबाजा, नाशिक ढोल, या सर्वाच्या सहकार्याने मिरवणुकीत रंगत आणली. तसेच मिरवणुकीतील शिवप्रेमींनी हातात घेतलेल्या व डौलाने फडकविण्यात येणाऱ्या भगव्या झेंड्यांमुळे संपुर्ण नागोठणे शहर भगवेमय झाले होते. या मिरवणुकीत शिवप्रतिमा असलेल्या पालखीचे नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच जागोजागी नागरिकांनी स्वागत करुन शिवप्रतिमेचे पूजन केले. ही मिरवणूक रात्री नऊ वाजता शाखेत पोहोचल्यानंतर शिवजयंती उत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात आला. हा शिवजयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.