जळगाव:- नसरापूर गावातील अमानूष घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शासनाला जमत नसेल तर आरोपीला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या, गावकरी त्याला योग्य ती अद्दल घडवेल अशी मागणी त्यांनी केली आहे.
रोहिणी खडसे आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटल्या की, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिशय संताप आणणारी घटना घडली आहे. नसरापूर गावात एका ६५ वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, दगडाने ठेचून तीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला.
माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या नराधमाला काहीही करून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. शासनाला जमत नसेल तर त्याला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या, गावकरी त्याला योग्य ती अद्दल घडवेल !