मंडणगड : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 34 साव्या अध्यक्षा म्हणून 16 मार्च 2026 रोजी निवड झालेल्या सौ. अस्मिता केंद्रे यांचे तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर सौ अस्मिता केंद्रे यांची झालेली निवड ही मंडणगड तालुक्याचे दृष्टीने ऐतिहासिक घटना असून या निवडीमुळे मंडणगड तालुक्यास जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी पहील्यांदा मिळाली आहे.

17 मार्च 2026 रोजी पंचायत समिती मंडणगड चे राजमाता जिजाऊ सभागृहात या निमीत्ताने स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर सभापती सौ. प्रणाली चिले, उपसभापती दिपक मालुसरे, पंचात समिती सदस्य अनिल रटाटे, सौ. दिप्ती घडशी माजी सभापती अनंत लाखण, भाई पोस्टुरे, रामदास रेवाळे, सुलतान मुकादम, नितीन म्हामुणकर, शिवसेना विभागप्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, वसिम चिलोलकर, सिध्देश देशपांडे, चेतन सातोपे, आनंद भाटे, विकास पवार, निलेश महाडीक, संतोष पार्टे, निलेश रक्ते, हरिश्चंद्र कोदेरे, सतिष दिवेकर, आदी मान्यवरांसह, शिवसैनीक, पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी, तालुक्यातील सामाजीक संघटना, संस्था, शिक्षक संघटना विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना सौ.

अस्मिता केंद्रे म्हणाल्या की पक्षाचे नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मंडणगड तालुक्यास माझ्या रुपाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी देत माझ्यासह पुर्ण तालुक्याचा नावलैकीक वाढविला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ, शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रामदास कदम, आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पायाभुत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी मी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. महिला, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, मच्छीमार समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाचा वापर करणार आहे.