मुंबई, दि. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY