अंबड : मुरारीनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने,आदरणीय युवासंत श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल ट्रस्ट व आरोग्यदूत विभागाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा भरघोस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गुरूपीठ येथील डॉ. ललिता गभाले, जिल्हा प्रशासकीय प्रतिनिधी केशवराव घोडेराव, जिल्हा आरोग्यदूत प्रतिनिधी राजेंद्र लोखंडे, सुनिता काकड, प्रशासकीय तालुका प्रतिनिधी मा श्री. दत्तात्रय काळे ,दत्तात्रय कुरहे, ज्ञानसंपदा वाचनालयाचे संचालक श्री प्रकाश भांड यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
शिबिरात नाडी परीक्षण करून सर्व रोगनिदान, योग विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात कावीळ, मधुमेह, संधिवात,डोकेदुखी, पाठदुखी, पीसीओडी, पोटदुखी, त्वचारोग, सायटिका, हृदयविकार, स्थूलपणा, घशाचे विकार, गुडघेदुखी, मानसिक विकार, स्त्रियांचे विकार, रक्ताच्या विकारांची मोफत तपासणी करून औषधे देण्यात आली. याप्रसंगी सिडको आरोग्यदूत विभागीय प्रतिनिधी सौ.मनीषा लोखंडे ,किरण मटाले, शालिकराम खंदारे, ठाकरे काका, दादा सोनवणे, स्वाती भदाणे आदींसह प्रतिनिधी व सेवेकरी उपस्थित होते.