लोटे : डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ, नवी दिल्ली येथे आयोजित ‘सी.आय.डी.सी. १७वे विश्वकर्मा पुरस्कार २०२६’ मध्ये उद्योजक निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि.ने तब्बल ९ प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावून अभूतपूर्व इतिहास घडवला आहे. कंपनीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी सन्मान मिळाल्याने हा क्षण स्कॉनसाठी अत्यंत अभिमानाचा आणि उद्योगक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

गुणवत्ता, सुरक्षितता, वेळेचे काटेकोर पालन, ग्राहकांचा विश्वास या तत्त्वांवर आधारित काम करण्यासाठी स्कॉन ओळखली जाते. अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी यशस्वी प्रकल्प पूर्ण करत स्कॉनने औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आपले नाव विश्वासार्हतेचे प्रतीक म्हणून स्थापित केले आहे. उद्योजक निलेश चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली स्कॉन प्रोजेक्ट्सने मिळवलेले हे यश केवळ कंपनीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण औद्योगिक बांधकाम क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.