मुंबई दि. 16 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन सर्व जाती धर्मीयांना न्याय दिला आहे. भारतात हिंदुची लोकसंख्या जास्त आहे पाकिस्तानातील मुस्लिमांच्या संख्येपेक्षा भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. भारत हा सर्वधर्मसमभाव बाळगणारा देश आहे. सर्व जाती धर्मात बंधुभावाची भावाची भावना वाढवली पाहिजे. जेवढी बंधुभावाची भावना वाढेल तेवढा देश मजबुत होईल. बंधुभाव मजबुत तर देश मजबुत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भारतात जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही. मुस्लिमांच्या रक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सद्या लव जिहाद या संकल्पनेचा बाऊ केला जात आहे. मात्र लव जिहादवर रिपब्लिकन पक्षाचा विश्वास नाही. जातीभेद निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची भुमिका रिपब्लिकन पक्षाची आहे असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सोहेल शेख, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, अजगर शेख, इश्तेखार अहमद शेख, मोहम्मद शेख, जलाल शेख, अमन काजी, फरीद कुरेशी, इब्राहिम शेख, सुनिल पवार, शाह आलम आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.