मुंबई : वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, एकादशी उपवास, आळंदी पंढरीची वारी आणि भजन, कीर्तन याबरोबरच शुद्ध आचार विचार.राम कृष्ण हरी’ हाच एकमेव मंत्र आहे.वारकरी संप्रदायाचा ध्वज हा काऊच्या रंगाचा आहे भगवा नाही तसेच वारकरी संप्रदायाचा वारकऱ्यांचा पोशाख पांढरीशुभ कपडे पांढरी टोपी फेटा असते, मंबाजीची पार्टी की तुकोबांची पार्टी आहे, याचे उत्तर घुसखोराने द्यावे , असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
विकास लवांडे बोलताना म्हणाले की,वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग अर्थात श्री विठ्ठल रखुमाई आहे,वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, संत तुकाराम महाराजांची गाथा, पंचरत्न हरिपाठ इत्यादी सर्व संतांचे साहित्य,वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, योग याग विधी, होम हवन, यज, व्रत वैकल्ये, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी याला अजिबात थारा नाही, वारकरी संप्रदायात कोणताही गुप्त मंत्र नाही फक्त’राम कृष्ण हरी’ हाच एकमेव मंत्र आहे, असे विकास लवांडे बोलताना म्हणाले.