रायगड (धम्मशील सावंत) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरण पाणी समस्ये बाबत कायम चर्चेत आहे. या धरणातून पाणीपुरवठा आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत,धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती दिसून येतेय.
१९७८ मध्ये सुरू झालेल्या या धरणाला ४८ वर्षे पूर्ण झाली असून, आजतागायत एकदाही धरणाचा गाळ काढण्यात आलेला नाही. यामुळे धरणाची ८७ दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता घटली आहे. गाळ साचल्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठा पुरेसा टिकत नाही, ज्याचा थेट फटका परिसरातील गावांला बसत आहे. उमठे धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा होतो.नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. राऊळ म्हणाले. उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ऍडवोकेट राकेश पाटील यांनी उमठे धरणाच्या प्रश्नाला राजकीय व प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याच म्हटलंय.