अहमदनगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आमदार संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

राहुरीत गेल्या तीन चार वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांनी सावध राहून ‘सेटिंगच्या राजकारणा’ला नाकारावे आणि पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.