मुंबई, दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात १३ बालविवाह रोखण्यात यश आले याचे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी सामूहिक विवाहांसोबत बालविवाहांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती
या सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75
🔵 Follow फेसबुक Page🔵👇🏻
https://www.facebook.com/sagarwavemedia
🔴Follow इंस्टाग्राम Page 🔴👇🏻
https://www.instagram.com/sagarwavemedia/
⏯️Youtube
https://www.youtube.com/channel/UCp4wREKEzO6OtiM–IRGMEA
