चिपळूण, दि. २९ एप्रिल: पेठमाप येथील विहार मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९८४ साली स्थापन झालेल्या या मंडळाचे हे ४२ वे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर रात्री ठीक १०.३० वाजता प्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर लिखित स्वतंत्र, सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ सादर होणार आहे.
सदर नाटकाचे दिग्दर्शन श्री. दिपक आंबुर्ले यांनी केले असून नेपथ्य श्री. संदेश कदम, श्री. राकेश तांबडे, श्री. बबन शेट्ये व श्री. प्रसन्न रेडिज सांभाळत आहेत. प्रकाश योजना व साउंड सिस्टिमची जबाबदारी श्री. पंकज तांबडे, श्री. दिपक आंबुर्ले व श्री. दिपक विष्णू कदम यांच्याकडे आहे. प्रमुख कलाकार: ताई – सौ. ज्योत्स्ना कदम, बाबा – श्री. संतोष चव्हाण, रंगराव – श्री. राकेश तांबडे, बापू – श्री. मुकुंद कदम, सुभाष – श्री. सुशील शिंदे, पठाण – श्री. स्वप्नील शिंदे, शारदाबाई गोखले – सौ. प्रिया शिंदे, अविनाश गोखले – कु. शुभम कदम, पो. इन्स्पेक्टर – श्री. सुयोग खेडेकर यांसह अनेक स्थानिक कलाकार या नाटकात भूमिका साकारणार आहेत.
कार्यक्रमाचे स्थळ: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर “सौ. अर्चना व श्री. अरविंद (आप्पा) विष्णू रेडिज” सभामंडप, पेठमाप (परीट आळी), चिपळूण. विहार मित्र मंडळ, पेठमाप (रजि. नं. एफ – ६९७० – रत्नागिरी) यांच्या वतीने ‘श्रम-एकता-विकास’ या ब्रीदवाक्यानुसार गेली ४२ वर्षे सातत्याने सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
