मुंबई- नसरापूर (जि. पुणे) येथे घडलेली घटना अतिशय वेदनादायी आणि निंदनीय आहे. विकृतपणाची परिसीमा या घटनेत गाठली गेली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक या समाजात कसे तयार होतात, याचाही विचार करायला लावणारी ही घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी संताप व्यक्त केला.

त्या चिमुरडीच्या आई-वडिलांनी किती असह्य वेदना सहन केल्या असतील याची केवळ कल्पनाही अस्वस्थ करणारी आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी व्यक्त केलेला रोष समजू शकतो असे सांगतानाच या प्रकरणात अत्यंत तत्परतेने आणि कठोर कारवाई करावी. दोषी नराधमाला अशी कठोर शिक्षा व्हावी की भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत कोणाच्याही मनात निर्माण होऊ नये अशी विनंती सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.