रायगड ( मनोज खांबे ) : रायगडच्या महाड तालुक्यातील वहुर गावच्या उगवती वाडीवरील महिला मंडळाने लग्न कार्याबाबत महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे. लग्ना समारंभात मोठा खर्च हा कापड आहेर म्हणजेच बस्ता बांधण्यावर होतो. यामध्ये यजमान्यांकडून पाहुणे आणि नातेवाईकांना साड्या आणि कापड खरेदी होते.

यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो तर उटणे आणि हळदी समारंभात चिकन, मटण आणि दारू देखील दिली जाते यावर देखील मोठा खर्च होतो तर वादाचे प्रसंग घडतात. अधिकचा खर्च आणि चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे पालन न करणाऱ्या लग्न घरात महिला मंडळ मदत करणार नाही असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. शिमग्याच्या निमित्ताने ग्रामस्थ तसेच चाकरमानी यांच्या उपस्थितीत महिलांनी मिटींग घेत हा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH