चिपळूण – माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री. अनंत गंगाराम गीते यांची कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती यांच्यावतीने भेट घेऊन लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड बाबत पिफास उत्पादन बंद व कंपनी कायम स्वरुपी बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
तसेच आपल्या लोटे येथील स्थानिक काही खोकेधारक व चहा टपरी व्यवसायिक यांच्यावर भविष्यात एमआयडीसी कडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत स्थगिती देण्याच्या विषयी निवेदन देण्यात आले. या भेटीच्या वेळी दोन्ही समित्यांमार्फत श्री. रवीशेठ गोवळकर, श्री.कांचन चाळके, श्री.अंकुश चाळके, श्री. प्रकाश खरात, श्री. रोशन खरात आणि जाधव साहेब उपस्थित होते.