नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आणि मतदारांनी तीन राज्यात सत्तांतर घडवून आणले.पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्ता परिवर्तन घडले असून आसाममध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे तर पुद्दुचेरीतही भाजपने आपले वर्चस्व राखले.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून असलेली ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाची सत्ता भाजपाने उलथवून लावली आहे. पश्चिम बंगालचा गड भाजपाने आपल्या ताब्यात घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये काय निकाल लागतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार भाजपने या राज्यावर सत्ता प्रस्थापित केली आहे.

तमिळनाडूचा ही मोठी राजकीय उलथापालथ मतदारांनी घडून आणली. प्रसिद्ध अभिनेता विजय थलपती याने स्थापन केलेल्या टीव्हीके या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. 234 जागांपैकी 110 जागा टीव्हीके पक्षाला मिळाल्या आहेत. आसाममध्ये 126 जागांपैकी 102 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. या राज्यात भाजपने विजयाची हॅट्ट्रिक साध्य केली आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता काँग्रेसने धुळीस मिळवली असून 140 पैकी 102 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

पुद्दुचेरीमध्ये तीस जागांपैकी भाजप प्रणित आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. भाजपच्या गोठ्यात आणि काँग्रेसच्या गोटातही विजय उत्सव साजरा केला जात आहे. तमिळनाडूत अभिनेता विजय हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

असा आहे पाच राज्यांचा सविस्तर निकाल –

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा धुव्वा .. भाजपची सत्ता येणार..

एकूण जागा २९३ – १) भाजप २०५ ,२) तृणमल काँग्रेस ८२ , ३)काँग्रेस ..१ , ४)इतर ..

तमिळनाडूत अभिनेता विजय थलपती यांच्या tvk पक्षाची येणार सत्ता..!

एकूण जागा २३४ – १) द्रमुक- काँग्रेस – ७२ , २) अद्रमुक- भाजप – ५२ , ३) टिव्हिके – ११०

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता…!

एकूण जागा १४० – १) काँग्रेस- १०२ , २) माकप- ३५ , ३) भाजप-

आसाममध्ये भाजपाची सत्ता…!

एकूण जागा १२६ – १) भाजप- १०२ , २) काँग्रेस –१९ , ३) इतर पक्ष-

पुद्दुचेरीत भाजपचे वर्चस्व

एकूण जागा ३० – १) भाजप- १७ , २) काँग्रेस- , ३) इतर-