खेड : – तालुक्यातील साईधाम बिजघर येथील साईमंदिराचा ३० वा वर्धापनदिन सोहोळा शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे मंदिराचे प्रवर्तक सदानंदराव भोसले यांनी प्रसिध्दीमाध्यमांना कळविले आहे.
यावेळी मंदिरात सकाळी ५ वाजता काकडआरती, सायंकाळी ५ वाजता सत्यनारायणाची महापूजा तर ७ वाजता मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. रात्री ९ वाजता साई भंडारा तसेच रात्री बिजघर ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन होणार असल्याचे मंदिराचे प्रवर्तक व मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले. तरी सर्व साईभक्त, बिजघर ग्रामस्थ व खेड तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सह कुटुंबसह परिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.