खेड (प्रतिनिधी) : – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील जांबुर्डे – मोरवंडे प्राथमिक मराठी केंद्र शाळेच्या पाठीमागील भागातील जंगलमय भागात सुधीर दत्तात्रय चव्हाण ( ३९ , रा. चाफळ – लक्ष्मीनगर., ता. पाटण., जि. सातारा) यांचा आकस्मिक मृत्यु झाल्याची घटना बुधवार दिनांक १३ मे २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता घडली.
याबाबतची खबर रोहीत मधुकर चव्हाण रा. चाफळ ता. पाटण जि. सातारा यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार., मयत सुधीर चव्हाण हे आपली दुचाकी क्रमांक एमएच 50 Z 5890 वरुन आपल्या राहत्या घराहुन निघाले ते दापोली, जि. रत्नागिरी येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाले होते. महामार्गावरील आबाचा ढाबा येथे आपली दुचाकी उभी करुन समोरील शाळेच्या पाठीमागील जंगलमय भागात दारुच्या नशेत उताणा अवस्थेत पडलेले आढळुन आले. त्यानंतर त्यांना अँब्युलन्सने कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले., तेथील डॉक्टरांनी तपासून दि.१३ मे रोजी रात्री १०:३८ वाजता ते मयत असल्याचे घोषित केले.